या आयफोनची हिंदुस्थानात विक्री नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

अ‍ॅपल वंâपनीने स्वस्तात विकल्या जाणाऱ्या आयफोन एसई, आयफोन ६ एस, आयफोन ६ प्लस आणि आयफोन ६ एसप्लस या चार आयफोन्सची हिंदुस्थानातील विक्री बंद केली आहे. अ‍ॅपलने नव्या व्यापार धोरणानुसार विक्रीच्या संख्येपेक्षा विंâमतींवर लक्ष्य केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. या चार फोन्सचा पुरवठा मागील महिन्यापासून थांबविण्यात आला आहे. अ‍ॅमेझॉनवर हे चारही फोन आऊट ऑफ स्टॉक झाले आहेत. तर फ्लिपकार्टवर आयफोन एसई आणि ६ प्लस हे दोनच फोन स्टॉकमध्ये आहेत.