पोलीस असल्याचे सांगून दिड लाखांची फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

पोलीस असल्याचे बतावणी करुन सोन्याचे दागिने व रोख ४० हजार रुपये असा एकूण १ लाख ५० हजार रुपयाचा ऐवज काढुन घेऊन फसवणूक केल्याची घटना चाकूर येथे घडली.

या प्रकरणी वामनराव माधवराव गरड रा.अंबुलगा ता.चाकूर यांनी चाकूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अज्ञात इसमाने फिर्यादीस आम्ही पोलीस आहोत असे बतावणी करुन तुमच्याजवळील सोने आमच्याकडे द्या असे म्हणून फिर्यादीकडून दोन सोन्याच्या अंगठ्या १२ ग्रॅम, १ लॉकेट २.५ तोळे व नगदी ४० हजार रुपये असा एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला व फिर्यादीची फसवणूक केली. या प्रकरणी अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.