‘विष्णूजी की रसोई’ टेक्सासमध्ये सर्वोत्कृष्ट रेस्टॉरंट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी अमेरिकेतील डॅलस शहरात ‘विष्णूजी की रसोई’ रेस्टॉरंट सुरू केले आहे. या रसोईची टेक्सास राज्यात सर्वोत्कृष्ट रेस्टॉरंट म्हणून निवड झाली आहे. या सन्मानामुळे विष्णू मनोहर यांना फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट ओनर्स असोसिएशन, युएसएद्वारे प्रायोजित युनायटेड स्टेट्सच्या वर्षातील सर्वोत्कृष्ट शेफसाठी आपोआप नामांकन मिळाले आहे. त्यामुळे अमेरिकेतील सर्व हिंदुस्थानींनी फेडरेशनच्या वेबसाईटवर जाऊन मतदान करावे, अशी विनंती मनोहर यांनी केली आहे. त्यांनी नागपूरमध्ये सर्वप्रथम ‘विष्णूजी की रसोई’ ची सुरुवात केली. त्यानंतर पुणे, मुंबई व लातूर या शहरांत रसोई सुरू केली. परदेशातही ते  रसोईच्या माध्यमातून मराठमोळे पदार्थ आणि वऱहाडी खाद्यसंस्कृतीची मेजवानी देत आहेत.