ब्राझीलच्या धर्तीवर राज्याच्या साखर उद्योगात बदल करायला हवेत! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साखर उद्योग क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान स्वीकारून भविष्याचा वेध घेतला तर चांगली प्रगती साधता येईल. ब्राझीलने साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी केलेल्या उपायांचा अभ्यास करून आपणही अनुकूल बदल करणे गरजेचे आहे, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली.

वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट येथे आयोजित साखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या साखर परिषदेला पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, आपला देश कृषिप्रधान आहे. शेतकरी कष्ट करण्यासाठी मागे पडत नाही. साखर, इथेनॉलच्या मागणीबाबत बाजाराचा अभ्यास करून कोणते उत्पादन करून बाजारपेठ काबीज करावी याबाबत त्यांना मार्गदर्शन करावे लागेल.

साखर कारखानदारांनी दम असेल तेवढी इथेनॉल निर्मिती करावी; नितीन गडकरी यांचे आवाहन

हिंदुस्थानात पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल टाकण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार एक हजार कोटी लिटर इथेनॉल लागणार आहे. त्यामुळे साखर कारखानदारांनी त्यांच्यात दम असेल तेवढी इथेनॉलची निर्मिती करावी. पाच वर्षे ते घेण्याची हमी मी देतो,’ असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. ‘पुण्यात इथेनॉलचे इंडियन ऑइलचे तीन पंप सुरू करणार असल्याचेही ते म्हणाले.