केदारनाथमध्ये भीषण अपघात, हेलिकॉप्टरच्या पंख्याने अधिकाऱ्याचा गळा कापला; जागीच मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंड येथे चार धाम यात्रा 2023 च्या दुसऱ्या दिवशी केदारनाथ धामच्या हेलिपॅडवर भीषण अपघात झाला. या अपघातात एका अधिकाऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे आहे. केदारनाथ हेलिपॅडवर एक हेलिकॉप्टर उतरत असताना उत्तराखंड सिव्हिल एव्हिएशन एजन्सीचे (UCADA) फायनान्स कंट्रोलर अमित सैनी हे हेलिकॉप्टरसोबत सेल्फी घेत होते. यावेळी सेल्फी घेण्याच्या नादात हेलिकॉप्टरचा पंखा त्यांच्या मानेवर लागला आणि पंख्याने या अधिकाऱ्याचा गळा कापला गेला. यात या अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. सैनी यांचा चॉपरच्या मागील ब्लेडने गळा चिरून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.