मिरचीपूड डोळ्यात टाकून तळजाई टेकडीवर तरुणाला लुटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मैत्रिणीसोबत तळजाई टेकडीवर फिरत असताना भरदिवसा चोरट्याने तरुणाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून मोबाईलसह रोकड चोरुन नेली. ही घटना सोमवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी प्रेम जितेंद्र जामदार (वय 21, रा. हिंगणे) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास प्रेम मैत्रिणीसोबत तळजाई टेकडीवर फिरत होता. त्यावेळी पाठीमागून आलेल्या एका चोरट्याने त्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली. हातातील काचेच्या बाटलीने मारहाण करण्याची धमकी देत मोबाईलसह रोकड असा एकूण 10 हजारांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी सिंहगड पोलीस तपास करीत आहेत.