
चीनच्या कुरापती सुरूच असून, आता हिंदुस्थानच्या वीज वितरण केंद्रांना लक्ष्य केले आहे. चीनी हॅकर्सनी लडाखच्या पॉवर ग्रीडवर हल्ला केल्याचे खळबळजनक वृत्त आहे. हिंदुस्थानी लष्कर आणि तेथील परिसरातील गुप्त माहिती मिळविण्यासाठी चीनकडून प्रयत्न केला जात आहे.
दोन वर्षांपासून चीनच्या घुसखोरीमुळे लडाख परिसरात तणाव आहे. चीनच्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदुस्थानी लष्कर सज्ज आहे. चीनने आता लडाखमधील पॉवर ग्रीडला लक्ष्य केले आहे.
चीनच्या लष्कराने हॅकर्सच्या मदतीने सायबर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘रेकॉर्डेड फ्यूचर’ या सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील संस्थेने दिलेल्या अहवालात ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.




























































