हिंदुस्थान सीमेवर चीनच्या कुरापती पुन्हा सुरू, जवानांची संख्या वाढवली, शस्त्रास्त्रही तैनात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या नियंत्रण रेषेवर चीनच्या कुरापती पुन्हा सुरू झाल्या आहेत. चीन तिथे जवानांची संख्या सातत्याने वाढवत आहे. इतकेच नव्हे तर शस्त्र्ाास्त्र्ाांची जमवाजमवही सुरू आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नियंत्रण रेषेवरील वातावरण गरम झाले आहे. नियंत्रण रेषेवरील हिंदुस्थानच्या जमिनीवर अतिक्रमण करण्याचा चीनकडून प्रयत्न होत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवत्ते अरिंदम बागची यांनी ही माहिती दिली. चीनकडून नियंत्रण रेषेवर कुरघोडी सुरू असल्या तरी हिंदुस्थानही आपल्या सीमेच्या रक्षणासाठी तयार आहे, असे बागची यांनी सांगितले. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवत्ते चुनियांग यांनी नियंत्रण रेषेवरील चीनच्या जमिनीवर बेकायदेशीररित्या कब्जा करण्याचा हिंदुस्थानी लष्कर प्रयत्न करत असल्याचा आरोप बुधवारी केला होता. बागची यांनी तो फेटाळून लावला. चीनकडून नियंत्रण रेषेवर हालचाली वाढल्यामुळेच हिंदुस्थानी लष्कर सतर्क आहे.