
श्रीनगरमध्ये 22 ते 24 मेदरम्यान जी-20 ची बैठक होणार आहे. चीनने या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. चीन वादग्रस्त भूभागावर कोणत्याही प्रकारच्या जी-20 बैठकीला ठाम विरोध करतो, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने आज अधिकृत निवेदन जारी करत म्हटले आहे. दरम्यान, आपल्या हद्दीत बैठका घेण्यास ते पूर्णपणे स्वतंत्र आहे, असे प्रत्युत्तर हिंदुस्थानने चीनला दिले आहे.
मार्च महिन्यात अरुणाचल प्रदेशमध्ये जी-20 बैठक झाली होती. तेव्हादेखील चीन या बैठकीत सहभागी झाला नव्हता. त्यावेळी पाकिस्तानने चीनच्या या बहिष्काराचे समर्थन केले होते. महिनाभरापूर्वी कश्मीरमधील जी-20 बैठकीच्या निषेधार्थ चीन आणि पाकिस्तान प्रत्येक वेळी एकत्र उभे असल्याचे दिसून आले. या दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी करत कश्मीर वादाचा मुद्दा उपस्थित केला होता.
– तुकाa आणि सौदी अरेबियानेदेखील श्रीनगरमध्ये होणाऱया पर्यटन गटाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी नोंदणी केलेली नाही. हे देश पाकिस्तानप्रमाणेच हिंदुस्थानवर जम्मू-कश्मीरमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत आहेत.



























































