ट्रेड वॉरचा चीनला फटका

4

सामना ऑनलाईन, शांघाय

चीनचा आर्थिक विकासदर (जीडीपी) एप्रिल ते जून या तिमाहीत ६.२ टक्क्यांवर आला. हा विकासदर २७ वर्षातील सर्वात कमी आहे. यापूर्वी १९९२ मध्ये जानेवारी ते मार्च या तिमाहीत सर्वात कमी विकासदर नोंदविला गेला होता. अमेरिकेसोबत सुरू असलेल्या ट्रेडवॉरमुळे चीनचा विकासदर खालावला आहे. चीन जगातील सर्वाधिक अर्थव्यवस्था असलेला दुसरा देश आहे. अमेरिकेचे आयात शुल्क जास्त असल्याने चीनच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. अमेरिका आणि चीनमध्ये ट्रेडवॉर असेच सुरू राहिल्यास जगभरातील देशांना मंदीचा सामना करावा लागण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.