तिबेटसाठी अमेरिकेचा विशेष दूत, चीनचा तिळपापड

>> सनतकुमार कोल्हटकर

तिबेटसाठी अमेरिकेचे विशेष दूत म्हणून रॉबर्ट डेस्ट्रो यांच्या नियुक्तीनंतर चीनने अपेक्षेप्रमाणे जोरदार आदळआपट केली आहे. चीनच्या अंतर्गत व्यवहारामध्ये ही ढवळाढवळ असल्याचे चीनच्या प्रवक्त्याने जाहीर केले आहे. तिबेटमध्ये अस्थिरता माजविण्याचा यामागे डाव आहे, असेही चीनने म्हटले आहे. खरे तर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्यानंतर तिबेटसाठी विशेष दूत नियुक्त करण्याची 2017 मध्येच योजना आखली होती. त्या योजनेला आता मुहूर्त मिळाला असे दिसते.

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील प्रचार टिपेला पोहोचत असतानाच आणि निवडणूक निकाल जाहीर होण्यासाठी केवळ दोन आठवडे शिल्लक असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी तिबेटसाठी अमेरिकेतर्फे विशेष दूताची नियुक्ती जाहीर करून चीनला पुन्हा एकदा लक्ष्य केलेले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी रॉबर्ट डेस्ट्रो यांची तिबेटसाठी विशेष दूत म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. चीनचे सरकार आणि तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांच्यातील संवादामध्ये वाढ करण्याचे उद्दिष्ट रॉबर्ट यांच्यासमोर ठेवण्यात आल्याचे माईक पॉम्पिओ यांनी सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांत तैवानला अनेक अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या विक्रीलाही परवानगी अमेरिकेतर्फे जाहीर करण्यात आली होती. हाँगकाँगला अमेरिकेने दिलेला विशेष व्यापारी दर्जाही काही काळापूर्वी अमेरिका आणि पाठोपाठ युरोपानेही काढून घेतला होता. तिबेट, तैवान, मंगोलिया, हाँगकाँग आणि जिनझियांग प्रांतातील ‘उघूर’ समुदायाला चीनतर्फे दिली जाणारी वागणूक या सर्व चीनशी संबंधित मुद्दय़ांवर अमेरिकेने चीनला घेरण्याचा जोरदार प्रयत्न चालू ठेवला आहे.

फ्रान्समध्ये नुकतेच ‘मंगोलिया’ संबंधित संग्रहालयाचे उद्घाटन झाले. या संग्रहालयामध्ये एकेकाळचा मंगोलियाचा क्रूरकर्मा योद्धा ‘चेंगिजखान’चा पुतळा ठेवला आहे. चीनने फ्रान्स सरकारला चेंगिजखान या नावाचा उल्लेख टाळण्यासाठी सूचना केली आहे. एकेकाळी चेंगीजखान याने चीनमध्येही मोठी कत्तल घडविली होती. त्यामुळे त्याच्या स्मृती जागविणेही चीनला नकोसे वाटते. अमेरिकेतील अध्यक्षपदाची निवडणूक संपून कोणत्याही पक्षाचा राष्ट्राध्यक्ष विराजमान झाला तरी अमेरिका आणि चीनमधील संबंधांमध्ये कडवटपणा पुढे चालू राहणार हे निश्चित.

रॉबर्ट डेस्ट्रो या तिबेटसाठीच्या विशेष दूतांवर ट्रम्प यांनी सोपविलेली जबाबदारीही लक्षणीय अशीच आहे. पीपल्स रिपब्लिक ऑफ चीन आणि तिबेटी लोकांची मान्यता असणारे तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांच्यामध्ये संवाद घडवून आणणे, तिबेटचे स्वतःचे असे धार्मिक, सांस्पृतिक आणि भाषिक स्वरूपाचे जतन करण्यासाठी प्रयत्न करणे, तिबेटी लोकांच्या मानवाधिकारासाठी दबाव तयार करणे, तिबेटमधील पर्यावरणाचे संरक्षण करणे, तिबेटी निर्वासितांच्या आर्थिक विकासासाठी काय मदत करता येईल ते पाहाणे अशा तारांकित मुद्दय़ांचा रॉबर्ट यांच्यावर सोपविलेल्या कामगिरीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तिबेटी जनतेवर चीनने चालविलेली दडपशाही, नावालाही न दिलेली स्वायत्तता, तिबेटी जनतेच्या मानवाधिकाराचे चीनकडून होत असणारे उल्लंघन आणि तिबेटी लोकांच्या धार्मिक, सांस्पृतिक स्वातंत्र्यावर चीनने घातलेली बंधने याबद्दल अमेरिकेने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. तिबेटच्या प्रतिरूप सरकारचे प्रतिनिधी लोबसांग सांगे यांनी रॉबर्ट यांची भेट घेतली.

तिबेटसाठी अमेरिकेचे विशेष दूत म्हणून रॉबर्ट डेस्ट्रो यांच्या नियुक्तीनंतर चीनने अपेक्षेप्रमाणे जोरदार आदळआपट केली आहे. चीनच्या अंतर्गत व्यवहारामध्ये ही ढवळाढवळ असल्याचे चीनच्या प्रवक्त्याने जाहीर केले आहे. तिबेटमध्ये अस्थिरता माजविण्याचा यामागे डाव आहे, असेही चीनने म्हटले आहे. खरे तर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्यानंतर तिबेटसाठी विशेष दूत नियुक्त करण्याची साल 2017 मध्येच योजना आखली होती. त्या योजनेला आता मुहूर्त मिळाला असे दिसते. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनीच अशा तिबेटसाठीच्या विशेष दूताची योजना पूर्वीच आखल्याचे सांगितले.

सध्या अमेरिका आणि चीन या दोघांमधील तणाव टिपेला पोहोचत असतानाच अमेरिकेकडून अशा विशेष दूताची नियुक्ती होण्यामुळे या दोन्ही देशांमधील कडवटपणा आणखी एका नव्या पातळीवर पोहोचला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या आक्रमक भूमिकेचा त्यांना सध्याच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत किती फायदा मिळेल याची उत्सुकता आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिअन यांनी अमेरिकेने तिबेटसाठी विशेष दूत नेमणे म्हणजे चीनच्या अंतर्गत धोरणांमध्ये ढवळाढवळ असल्याचे व तिबेटमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा अमेरिकेचा हेतू असल्याचे प्रतिपादन केले आहे. वर चीनने तिबेटला साल 1950 मध्ये तेथील सरंजामशाहीपासून मुक्त केल्याचे आणि तिबेटची उज्ज्वल प्रगतीकडे वाटचाल होत असल्याचे शहाजोग निवेदनही केले आहे. तिबेटियन धार्मिक गुरू दलाई लामा यांनी चीनच्या तिबेटवरील दमनशाहीला ‘सांस्पृतिक संहार’ केल्याचे म्हटले आहे.
तिबेट प्रश्नाकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधून घेऊन चीनवर पुरेसा दबाव आणण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी ठरविले असावे.

तिबेट हा चीनव्याप्त प्रदेश आहे असे येत्या काळात अमेरिकेने जाहीर केल्यास आश्चर्य वाटू नये अशीच परिस्थिती आहे. चीनच्या भौगोलिक विस्तारवादाला ब्रेक लावण्यासाठी पुरेपूर नियोजन करण्याचा प्रयत्न यामध्ये दिसत आहे. आता सर्व जागतिक समुदायाचे लक्ष असेल ते हिंदुस्थानकडे म्हणजे अर्थात हिंदुस्थानच्या भूमिकेकडे. सध्या चीनबरोबर लडाखमधील नियंत्रण रेषेवरून चर्चेची सातवी फेरी पार पडली. पण अजून चर्चेच्या इतक्या फेऱयांमधून काही पुढे आलेले नाही. त्यामुळे तिबेटबद्दल आपली भूमिका जाहीर करावयास हिंदुस्थानवर तूर्तास काही बंधने असू शकतात. त्यामुळे हिंदुस्थानतर्फे तिबेटबद्दल काही नवीन भूमिका जाहीर होईल अशी अपेक्षा बाळगण्यात अर्थ नाही.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या