
हिंदुस्थानने सीमेवर पायाभूत सुविधांची मजबुती केल्यामुळे चीनला मोठा पोटशूळ उठला आहे. रोहतांग पासच्या महत्त्वाकांक्षी अटल टनेलमुळे तर चिनी लष्कराची झोपच उडाली आहे. आता हिंदुस्थानच्या या मजबुतीवर त्यांनी गरळ ओकायला सुरुवात केले आहे.
चिनी सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘ग्लोबल टाइम्स’ या सरकारी दैनिकाने तर आपल्या लेखात युद्ध झाल्यास चिनी लष्कर हिंदुस्थानचा अटल बोगदा अगोदर उद्ध्वस्त करील असा सुका दम हिंदुस्थानी सरकारला दिला आहे. एलएसीवर शांतता असताना हिंदुस्थानला या बोगद्याचा चांगला उपयोग होईल; पण युद्धात त्याचा वापर झाल्यास चीनचे बलवान लष्कर तो बोगदा सहज नष्ट करील असा धमकीवजा इशारा चीनसाठी भुंकणाऱया ‘ग्लोबल टाइम्स’ने दिला आहे. या बोगद्यामुळे मनाली ते केलोंग हे अंतर 3-4 तासांनी कमी झाले असून आपत्कालीन वेळेत हिंदुस्थानी जवानांना वेगाने सीमेवर पोहोचता येणार आहे.



























































