गलवानमधून माघार घेण्यास चीनची सुरुवात, हिंदुस्थानची मात्र सावध भूमिका

galwan-valley

पूर्व लडाखच्या गलवान खोर्‍यातून एक ते दोन किलोमीटर आपले सैन्य मागे घेण्यास चीनने सुरुवात केली आहे. चिनी सैन्याने वाहने, तंबू, सैनिक मागे हटविण्यात येत असल्याचे वृत्त आहे. मात्र, पुरापतखोर चीनवर विश्वास ठेवता येत नाही. त्यामुळे हिंदुस्थानने सध्या ‘वेट अॅण्ड वॉच’चा सावध पवित्रा घेतला आहे. दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रविवारी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉलवर चर्चा केल्यानंतर सैन्य माघारीची प्रक्रिया सुरू झाल्याचे वृत्त आहे.

पँगाँग टीएसओ भागातही घुसखोरी

  • गलवान खोर्‍यातून एक ते दोन किलोमीटर माघार घेण्यास चिनी सैन्याने सुरुवात केली आहे. मात्र पुरापतखोर चीनच्या हालचालींवर हिंदुस्थानी लष्कराचे बारीक लक्ष आहे.
  • सैन्य, रणगाडे मागे घेत असले तरी वाहने अद्यापि गलवान खोर्‍यात असल्याचे वृत्त आहे.
  • चीनने केवळ गलवान खोर्‍यात नाहीतर पँगाँग टीएसओ, हॉप्रिंग भागातही घुसखोरी केलेली आहे. येथूनही चीनी लाल माकडं येथूनही माघारी फिरतात का? याकडे हिंदुस्थानचे लक्ष आहे.  

अजित डोवाल आणि परराष्ट्रमंत्र्यांची व्हिडिओ कॉलवर चर्चा

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वाँग ई यांच्यात रविवारी व्हिडिओ कॉलवर दीर्घ चर्चा झाली. सध्याची प्रत्यक्ष ताबारेषेवरील स्थिती आणि भविष्यात काय घडू शकते? यावर दोघांमध्ये चर्चेनंतर चीन सैन्य माघार घेण्यास सुरुवात केल्याचे वृत्त आहे. यापुढे लष्करी आणि राजनैतिक पातळीवर दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरूच राहणार आहे.

 

चीनने अमेरिकेसह अवघ्या जगाची वाट लावली

कोरोनामुळे जगाचे आतोनात नुकसान होत आहे. चीनने अमेरिकेसह जगाची वाट लावली, असा आरोप राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. कोरोना हा चायनीज व्हायरस असल्याचे यापूर्वी ट्रम्प यांनी म्हटले आहे. चीनमधील या व्हायरसने अमेरिकेसह जगाचे खूप नुकसान केले आहे. या नुकसानीला चीन सरकार जबाबदार असून जगाची वाट लावली आहे, असा आरोप  केला.

आपली प्रतिक्रिया द्या