
सध्या रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी डॉक्टर डार्क चॉकलेट आवर्जून खायला सांगतआहेत. हेच बहुगुणी चॉकलेट सौंदर्य साधनेतही उपयोगी ठरते. चॉकलेटचा वापरफेशिअलमध्ये आता सर्रास केला जातो. आता ब्युटी सलोन बंद असल्याने हे फेशिअलघराच्या घरीही करता येते. चॉकलेटचा स्वाद आणि सुगंध या दोन्हीमुळे मन आनंदी हे आतासिद्ध झाले आहे. या फेशिअलमुळे रक्तातील सेरोटेनीन हा घटक वाढतो त्यामुळे मानसिक तणाव कमी होतो.
चॉकलेट फेशिअल करताना
सुरुवातीला दुधाने चेहरा साफ करून घ्या. यानंतर ओटमील, डीस्प्रीनची गोळी, डार्क चॉकलेटचे विरघळलेले तुकडे, एक चमचा कॉफी आणि मध असे मिश्रण एकत्र करून ते चेहऱ्यावर लावा. गोलाकार बोटे फिरवून चेहऱ्याला मसाज करा. यामुळे रक्त पुरवठा सुरळीत होऊन चेहऱ्यावरील मृत पेशी निघून जातात.
दुसरा टप्पा
पाण्यात थोडे बोरिक असिड मिसळून त्यात रुमाल भिजवून तो चेहऱ्यावर थोडावेळ ठेवा. आणि चेहऱ्यावरून बर्फ फिरवा.
मसाजचे महत्व
एलोवेरा तेलात चॉकलेटचे तुकडे घालून ठेवा. त्यात थोडे नारळ पाणी आणि सीसाल्टघालून मिश्रण तयार करून त्याने चेहऱ्याला मसाज करा.
शेवटचा टप्पा
चॉकलेट जरा विरघळवून घ्या आणि चेहऱ्याला १० मिनिटे लावून ठेवा. मग पुन्हा चेहऱ्यावर बोरिक असिडच्या पाण्यात भिजवलेला रुमाल ठेवा. आणि पुन्हा बर्फ फिरवा.यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.
चॉकलेट फेशिअलचे फायदे.
1) हे फेशिअल कोणत्याही प्रकारच्या त्वचेवर केले जाऊ शकते.
2) चॉकलेटमध्ये त्वचेला सूर्यप्रकाशापासून वाचविण्याची क्षमता असते.
3) यामुळे त्वचेत ओलावा निर्माण होऊन त्वचा कोमल होते.
4) चॉकलेट फेशिअल त्वचेमध्ये वेगाने कोलोजन तयार करते. यामुळे त्वचेची लवचिकता टिकून राहते.



























































