बाबो! 23 व्या वर्षी बनली 11 मुलांची आई, 100 मुलांना जन्म देण्याची इच्छा

ऐकावे ते नवलच असेच तुम्ही म्हणाल कारण रशियामध्ये राहणारी एक महिला 23 व्या वर्षी 11 मुलांची आई झाली आहे. क्रिस्टिना ओज्टर्क (Christina Ozturk) असे या महिलेचे, तर गालिप ओज्टर्क (Galip Ozturk) असे तिच्या पतीचे नाव आहे. मुलांची आवड असलेल्या क्रिस्टिनाला 100 मुलांची आई होण्याची इच्छा आहे. ‘न्यूजफ्लॅश मीडिया’ने याबाबत वृत्त दिले आहे.

वृत्तानुसार, क्रिस्टिना ओज्टर्क ही वयाच्या 17 व्या वर्षी पहिल्यांदा आई झाली होती. त्यावेळी तिने मुलीला जन्म दिला होता. यानंतर मात्र ती एकदाही गरोदर राहिली नाही, मात्र सरोगसी पद्धतीने तिने 10 मुलांना जन्म दिला आहे. सर्व मुलं आमचे जेनेटिक्स असून आगामी काळात आम्हाला आणखी मुलं जन्माला घालायची आहेत, असेही क्रिस्टिना म्हणाली.christina-ozturk-4

याआधी जॉर्जियाच्या बातुमी शहरात राहणाऱ्या क्रिस्टिना आणि गालिप या जोडप्याने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून आम्हाला 105 मुलं हवी आहेत, असे म्हटले होते. यानंतर ही पोस्ट तुफान व्हायरल झाली होती. याबाबत क्रिस्टिनाला विचारण्यात आला तेव्हा तिने आम्ही संख्येचा विचार केलेला नाही, मात्र आम्ही 11 वर थांबणार नसल्याचे म्हटले. आम्ही अंतिम आकडा ठरवलेला नाही. प्रत्येक गोष्टींचा विचार करण्याची एक वेळ असते आणि त्यानुसार त्यात बदल होऊ शकतो, असेही तिने म्हटले.

christina-ozturk-2

क्रिस्टिन आणि गालिप ज्या शहरात राहतात तिथे सरोगस पद्धतीने मुलांना जन्म देणे बेकायदेशीर नाही. परंतु सरोगसी पद्धतीने मुलांना जन्म देण्यासाठी 8 हजार युरो (जवळपास 7 लाख रुपये) मोजावे लागतात. त्यामुळे जर या जोडप्याला खरंच 100 मुलांना जन्म द्यावा असे वाटत असेल तर त्यांना 70 कोटी रुपये खर्च करावे लागतील, तसेच या मुलांच्या पालन-पोषणांचा खर्चही वेगळाच.

christina-ozturk-1

सरोगसी म्हणजे काय?

ज्या व्यक्तीला किंवा जोडप्याला पालक व्हायचे आहे परंतु काही वैद्यकीय कारणास्तव ते मूलाला जन्म घालू शकत नाही तर त्यासाठी सरोगेट मदरचा किंवा सरोगसीचा पर्याय निवडला जातो. सरोगसी म्हणजे उसना गर्भ घेऊन बाळाला जन्म देणे. पुरुषाचे शुक्राणू आणि स्त्रीचे स्त्रीबीज यांचे प्रयोगशाळेत फलन केले जाते आणि ते सरोगेट मदरच्या गर्भाशयात ठेवले जाते. हा गर्भ नऊ महिने वाढू दिला जातो. त्यानंतर त्या बाळाचा जन्म होतो.

आपली प्रतिक्रिया द्या