
नागालँडमधील मोन जिल्ह्यातील तिरू व ओटींग गावाच्या दरम्यान सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात 13 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री नेफिओ रिओ यांनी या घटने वर दुख व्यक्त केले असून त्याच्या तपासासाठी उच्च स्तरीय समिती स्थापन केली आहे. पीटीआयने याबाबतचे वृत्त दिले आहे.
At least 11 civilians gunned down by security forces in Nagaland’s Mon district; CM Neiphiu Rio promises high-level probe, appeals for peace
— Press Trust of India (@PTI_News) December 5, 2021
या गावातील कोळसा खाणीवर काम करणारे कामगार त्यांच्या घरी परतत असताना हा गोळीबार झाला. या घटनेने गावातील नागरिक संतापले असून त्यांनी पोलिसांच्या गाड्या जाळल्या आहेत.
Incident & its aftermath deeply regretted: Army on killing of civilians in anti-insurgency operation in Nagaland’s Mon district
— Press Trust of India (@PTI_News) December 5, 2021
दरम्यान लष्कराने गुप्तचर यंत्रणांच्या आधारे ही कारवाई केल्याचे म्हटले असून या प्रकरणात दोषी असलेल्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
Army orders Court of Inquiry into killing of civilians during anti-insurgency operation in Mon district of Nagaland: Officials
— Press Trust of India (@PTI_News) December 5, 2021





























































