
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई महाराष्ट्राच्या विधान भवनात येत असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद खाली आहे. हे परंपरेला साजेसे नाही. त्यामुळे विरोधकांनी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला. यानंतर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसत चीफ जस्टिस न्याय द्या,चीफ जस्टिस न्याय द्या… असे म्हणत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश महाराष्ट्राच्या विधान भवनात येत असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवणाऱ्या सरकारचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करून निषेध केला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवणे हे विधिमंडळाच्या प्रथा – परंपरांना साजेसे नाही, त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकला. त्यानंतर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत विधानसभा दणाणून सोडली.
सरन्यायाधीश भुषण गवई हे आज महाराष्ट्राच्या विधान भवनात येणार आहेत. अशावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद खाली असणे हे परंपरेला साजेसे नाही. त्यामुळे विरोधकांनी विधानसभेच्या कामकाजवर बहिष्कार टाकला. तसेच पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. pic.twitter.com/NsdamJEOHF
— Saamana Online (@SaamanaOnline) July 8, 2025
विधानसभेचे कामकाज सुरू होताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानसभेतील गटनेते भास्कर जाधव यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्र विधानमंडळ सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई यांचे स्वागत करेल तेव्हा विरोधी पक्षनेत्याची जागा मोकळी असेल. विरोधी पक्षाला त्यांचे स्वागत करता येणार नाही. आपर्यंत 10 सदस्य संख्येची अट सांगितली जात होती, पण ती अट कुठेही नाही, असे भास्कर जाधव यांनी म्हटले.
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडावा आणि त्यानंतर चर्चा करू अशी पळवाट काढली. मात्र भास्कर जाधव यांनी सरन्यायाधीश येत असताना लोकशाहीचा गळा कसा घोटला जातोय हे आम्ही दाखवून देऊ असे म्हटले आणि विरोधकांनी सभात्याग करत कामकाजावर बहिष्कार टाकला.