कोविड विषाणूला रोखण्यास कागद, कापडच बेस्ट, पवईतील आयआयटी मुंबईच्या संशोधकांचा अभ्यास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोविड विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी कागद किंवा कापडच उत्तम आहे असा निष्कर्ष पवई येथील आयआयटी मुंबईतील संशोधकांनी काढला आहे. कारण कोविडचा विषाणू काचेच्या पृष्ठभागावर चार दिवस तर प्लॅस्टिक आणि स्टीलच्या पृष्ठभागावर सात दिवस जिवंत राहू शकतो असे त्यांना संशोधनाअंती आढळले आहे.

‘फिजिक्स ऑफ फ्लूइड’ या जर्नलमध्ये त्यांचा संशोधन अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. आयआयटी मुंबईच्या मेकॅनिकल इंजिनीयरिंग विभागातील संशोधकांनी हे संशोधन केले. कागदाच्या पृष्ठभागावर कोविडचा विषाणू फक्त तीन तास आणि कापडावर दोन दिवसच जिवंत राहू शकतो असे त्यांनी अहवालात म्हटले आहे.

कोविडग्रस्त रुग्णाचा खोकला किंवा शिंकेवाटे हवेत उडणाऱया तुषारांमधून कोविड विषाणूंचा फैलाव होतो. ते विषाणू काच, प्लॅस्टिक किंवा स्टीलच्या पृष्ठभागाला चिकटले तर चार ते सात दिवस जिवंत राहू शकत असल्याने संसर्गाची भीती अधिक असते असे या संशोधनात सहभागी सहयोगी प्राध्यापक रजनीश भारद्वाज यांनी म्हटले आहे.

हवेत उडणारे तुषार हे कागद आणि कापडाच्या पृष्ठभागावर स्थिरावले तर त्यांचे बाष्पीभवन वेगाने होते. त्यामुळे साहजिकच त्या तुषारांमधील विषाणू मरतात. प्लॅस्टिक, काच किंवा स्टीलचा पृष्ठभागावर मात्र विषाणू बरेच दिवस स्थिर व जिवंत राहू शकतो असे संशोधकांना दिसून आले. या संशोधनासाठी सच्छिद्र तसेच सच्छिद्र नसलेल्या पृष्ठभागांवर साध्या तुषारांचा वापर करून त्यांच्या बाष्पीभवनाचा वेग का@म्प्युटरच्या सहाय्याने संशोधकांनी जाणून घेतला.

संशोधकांनी दिलेले सल्ले

n रुग्णालये, कार्यालये आणि हॉटेल्समधील काच, स्टील किंवा लाकडी साहित्यांवर कापडी कव्हर लावण्यात यावीत.
n बगिचे, शॉपिग मॉल्स, रेस्टॉरंट्स, रेल्वे स्थानके आणि विमानतळांवरील प्रतीक्षागृहे अशा सार्वजनिक ठिकाणच्या आसनांवर कापडी आवरणे घालण्यात यावीत.