
जम्मू व कश्मीरमध्ये ढगफुटीने चार जणांचा बळी घेतला आहे. शनिवारी कश्मीर खोऱयातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात ढगफुटी झाली. ढगफुटीसह वीज कोसळल्यामुळे एका दाम्पत्यासह 4 लोक ठार झाले. पेंद्रीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशात दिल्ली, पंजाब, कर्नाटकसह तेलंगणात दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे.
जम्मू व कश्मीरच्या प्रशासकीय अधिकाऱयांनी सांगितले की, दक्षिण कश्मीरच्या पुलवामा जिह्यात पंपोरमध्ये ढगफुटी झाली. या ढगफुटीमुळे हिलाल अहमद हांजी (25) आणि त्यांची पत्नी रोजिया जान (25) यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे बडगाम जिह्यातील मुजपथरी भागात वीज कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला. देशात बर्फवृष्टीमुळे चारधाम यात्रा काही काळ थांबविण्यात आली होती, मात्र आता ती पुन्हा सुरळीत झाली आहे.
























































