मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट, चर्चांना उधाण

4702
CM devendra fadanvis diwakar raote meets Governor

राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सोमवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. राज्यपाल कोश्यारी यांना त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

राज्यात विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून जनतेने शिवसेना-भाजप महायुतीला जनादेश दिला आहे. निकालानंतर दिवाळी उत्सवाला सुरुवात झाल्याने सत्तास्थापनेच्या दृष्टीने मोठ्या घडामोडींना तशी सुरुवात झालेले नाही. मात्र आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर काही वेळाने दिवाकर रावते यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले. मात्र असे असले तरी दोघांच्या भेटी या दिवाळीनिमित्त सदिच्छा भेटी असल्याचे स्पष्ट सांगण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या