निवडणुकी नंतर शेकापला माईक्रोस्कोपने शोधावे लागेल – मुखमंत्री देवेंद्र फडणवीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
cm-devendra-fadanvis-csmt

विकास न करीता विकासाच्या नावाने केवळ राजकारण करणाऱ्या शेकापला निवडणुकीनंतर माईक्रोस्कोपने शोधावे लागेल, अशी टीका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ‘कोटय़वधी रुपयांच्या योजना राबवून रायगड जिल्ह्याचा विकास करणारे महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास देखील मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेण येथील प्रचारसभेत केला.

युती सरकारने पेण खारेपाटातील पिण्याच्या पाण्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून 38 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. युती शासनाने शेतकऱ्यांना 50 हजार कोटींची मदत केली. अतिवृष्टीग्रस्त, दुष्काळग्रस्त, खारलॅन्ड, फळबागांना आर्थिक मदत केली आहे. मुंबई – गोवा महामार्गाच्या माध्यमातून कोकणाचा सर्वांगीण विकास साधण्याची ग्वाही यावेळी मुखमंत्र्यांनी दिली.

या प्रचार सभेला मुखमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील, सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर, माजी आमदार अनिल तटकरे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेंद्र दळवी, सल्लागार किशोर जैन, उपजिल्हा प्रमुख नरेश गावंड, तालुका प्रमुख अविनाश म्हात्रे, महिला आघाडीच्या दिपश्री पोटफोडे, अवधूत तटकरे, रिपाइंचे जगदीश गायकवाड, म्हाडाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, वैकुंठ पाटील, लक्ष्मणशेठ नावडेकर, भाजपचे जिल्हा चिटणीस यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.