भाजपमध्ये जागा फुल्ल, आता भरती नाही! मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

144

सामना ऑनलाईन । अमरावती

विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाच गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये इतर पक्षांमधून नेत्यांची भरती होत आहे. बुधवारीच राष्ट्रवादी काँग्रेसचा चार बडे मासे भाजपच्या गळाला लागले. याच संदर्भात बोलताना, भाजपमध्ये जागा फुल्ल झाल्या असून आता भरती नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. भाजपच्या महाजनादेश यात्रेला गुरुवारी अमरावतीमधून सुरुवात झाली. यावेळी ते बोलत होते.

विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भाजपची महाजनादेश यात्रा सुरू झाली आहे. अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीतून या यात्रेची सुरुवात झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षात शिवसेना- भाजप युतीने केलेल्या कार्याचा आढावा घेतला. युती सरकारने शेतकऱ्यांपासून तर बेरोजगारांपर्यंत प्रश सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला यासोबतच गरिबांना सुद्धा न्याय दिला आहे, असे सांगितले. यावेळी त्यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत केलेल्या प्रत्येक कामाची माहिती देऊन करून दाखविल्याचे उदाहरणे देऊन स्पष्ट केले. महाजानदेश यात्रेला राज्यातील मंत्रिमंडळातील भाजपचे बहुतेक मंत्री, खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या