मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले विद्यार्थीनींचे अभिनंदन 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई 

बोस्टन, अमेरिका येथे गेल्या आठवड्यात झालेल्या इंटरनॅशनल जेनेटिकली इंजिनिअर्ड मशिन (आय जी ई एम २०१८) या स्पर्धेत या चमूने Best integrated human practices हे विशेष पारितोषिक व संशोधनासाठी सुवर्णपद पटकाविले. पानांचे डाग काढण्यासाठी अतिशय सोपे आणि पर्यावरणपूरक हे तंत्रज्ञान आहे. पान थुंकीचे डाग ही केवळ आरोग्याची समस्या नाही, तर त्यामुळे अनेक चांगल्या वास्तु सुद्धा खराब होतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानातून प्रेरणा घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला.

पानांचे डाग प्रभावीपणे नष्ट करण्याचे हे आर्थिकदृष्ट्या सुद्धा परवडणारे तंत्रज्ञान आहे. या डागाचा लाल रंग सुरक्षित रंगहीन उत्पादनात परावर्तित करणार्‍या सूक्ष्मजीवांचा या प्रकल्पात समावेश आहे.  बेस्ट प्रोजेक्ट अंडर एनव्हारमेंट ट्रॅक आणि बेस्ट प्रेझेंटेशन या दोन वर्गवारीत सुद्धा या प्रकल्पाचे मानांकन झाले आहे. संपूर्णपणे विद्यार्थिनींचा समावेश असलेल्या या चमूत ऐश्वर्या राजुरकर, अंजली वैद्य, कोमल बाळकृष्ण परब, निशिता पांगे, मैथिली सावंत, मिताली पाटील, सानिका आमरे आणि श्रृतिका सावंत यांचा समावेश आहे. या चमूला डॉ. अनुश्री लोकुर, डॉ मयुरी रेगे, सचिन राजगोपालन आणि मुग्धा कुळकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. कोमल परब ही अणावची आहे. कुडाळ पंचायत समितीचे कृषी अधिकारी बाळकृष्ण परब यांची ती कन्या होय.