मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाराणा प्रतापसिंह यांना जयंती निमित्त अभिवादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महान योद्धा महाराणा प्रतापसिंह यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले आहे. मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या महाराणा प्रतापसिंह यांच्याकडून पराक्रमाचा महान वारसा मिळाला आहे. उत्कृष्ट सेनानायक, मूर्तीमंत त्याग, शौर्याचे प्रतीक अशा या महान योद्ध्याला जयंतीनिमित्त शतशः नमन, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केलं आहे.