डिझेलची अवैधरीत्या वाहतूक करणारी नौका तटरक्षक दलाने घेतली ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डिझेल तस्करी केल्याप्रकरणी हिंदुस्थानी तटरक्षक दलाने रविवारी नैऋत्य मुंबई पासून 27 सागरी मैलावर ‘आई तुळजाई’ नावाची मासेमारी नौका त्यावरील चार कर्मचाऱ्यांसह ताब्यात घेतली. ताब्यात घेतलेल्या नौकेत अंदाजे 30 लाख रुपये किंमतीचे सुमारे 30 हजार लिटर अवैध डिझेल सापडले.

पकडलेले मासे ठेवण्याच्या टाक्यांमध्ये हे डिझेल लपवलेले होते. तसेच, 1.75 लाख रुपये बेहिशेबी रोकडही नौकेवरून जप्त करण्यात आली. ताब्यात घेतलेली नौका मुंबई बंदरात आणून पुढील चौकशी आणि कायदेशीर कारवाईसाठी तिथे ती सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिली.