लेस्बियन असल्याचे भासवत नग्न फोटो मागवले; ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट सुरू करत मुलींची फसवणूक करत त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी बंगळुरूमधील महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. बनावट अकाऊंटद्वारे त्याने अनेक मुलींची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंच ओपन करत लेस्बियन असल्याचे भासवून मुलींचा विश्वास संपादन करून आरोपी त्यांची नग्न छायाचित्रे मागवायचा. त्यांनी पाठवलेल्या छायाचित्रांद्वारे त्यांना तो ब्लॅकमेल करायचा. पैसे दिले नाहीत, तर छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी तो मुलींना देत होता. प्रंपच नचप्पा (21) असे आरोपीचे नाव असून तो बंगळुरुतील महाविद्यालयातील बीएस्सीचा विद्यार्थी आहे.

नचप्पाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट ओपन करत लेस्बियन असल्याचे भासवायचा. तो चॅटद्वारे मुलींचा विश्वास संपादन करत होता. मुलींचा विश्वास संपादन करत तो त्यांना न्यूड फोटो शेअर करायला सांगायचा. त्यांनी फोटो पाठवल्यानंतर ते फोटो अपलोड करण्याची धमकी देत तो त्यांना ब्लॅकमेल करत होता. त्यांने अनेक महिलांना आणि विशेष करून महाविद्यालयीन तरुणींना ब्लॅकमेल केल्याचे तपासात उघड झाले आहे.

फ्राझर शहरातील प्रपंच नचप्पाने सप्टेंबर 2021 मध्ये प्रतीक्षा बोहरा या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाऊंट ओपन केले. आपण लेस्बियन असून जोडीदाराच्या शोधात असल्याचे भासवले. मुलीसोबत चॅट करत तो त्यांचा विश्वास संपादन करत होता. त्यानंतर त्याने त्यांची नग्न छायाचित्रे शेअर करण्यास सांगितले. त्यांनी छायाचित्र पाठवल्यावर पैसे न दिल्यास फोटो अपलोड करण्याची धमकी देत ​​त्याने अमेक मुलींना ब्लॅकमेल केले. आपण मॉडेलिंगमध्ये असून मॉडेल बनू इच्छिणाऱ्यांना मदत करतो, असे भासवत त्याने 30-40 मुलींकडून दोन लाख रुपये उकळल्याचेही तपासात उघड झाले आहे. त्याने नेमकी किती पैसे उकळले, याची माहिती पोलीस घेत आहेत. त्याचे बँक तपशील पोलीस तपासत आहेत.

नचप्पाने बनावट अकाऊंटद्वारे लेस्बियन असल्याचे भासवत जोडीदाराच्या शोधात असल्याचे सांगितले. तिचा विश्वास संपादन करण्यासाठी काही नग्न छायचित्रे पाठवली आणि ती आपली असल्याचे सांगितले. तिनेही अशीच छायचित्रे शेअर करण्यास त्याने सांगितले. पाठवलेल्या प्रत्येक नग्न छायाचित्रासाठी 4 हजार रुपये देण्याचे प्रलोभनही त्याने दाखवले. त्यानंतर तरुणीने आधीही काही छायाचित्रे शेअर केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आपली फसवणूक होत असून आपण अडकल्याचे तरुणीला समजले. तिने नचप्पाला ब्लक केले. त्यामुळे नचप्पाने दुसरे बनावच खाते ओपन करत तरुणीकडे पैशांची मागणी करणारे मेसेज पाठवले. पैसे न दिल्यास फोटो अपलोड करण्याची धमकी दिली. नचप्पा ब्लॅकमेल करत असल्याने मुलीने पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रार दाकल झाल्यावर पोलिसांनी नचप्पाला शोध घेत त्याला त्याच्या घरातून अटक केली. त्याने प्रत्येक पीडितेकडून 4,000 ते 10,000 रुपये उकळले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.