आता मिळणार शुगर फ्री आंबे; पिकेपर्यंत सोळा वेळा बदलतो रंग

फळांचा राजा असलेल्या आंब्याची गोडी चाखण्याची मजा काही औरच असते. मधुमेहींना जास्त प्रमाणात आंबे न खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र आता मधुमेहादेखील आंब्यांवर मनसोक्त ताव मारू शकणार आहेत. लिची या फळाच्या उत्पन्नासाठी प्रसिद्ध असलेल्या मुझफ्फरपूर या शहरातील एका शेतकऱयाने आपल्या बागेत चक्क शुगर फ्री आंबा पिकवला आहे. हा आंबा दिसायला नेहमीच्या आंब्यांपेक्षा वेगळा असला तरी ही आंब्याचीच प्रजाती आहे. ज्याला अमेरिकन ब्युटी असे संबोधले जाते. एका आंब्याचे वजन अर्धा किलो असून हा आंबा पिकवण्यासाठी पाच महिने लागतात. जून-जुलैमध्ये म्हणजेच इतर आंब्याचा सीझन संपल्यावर हा आंबा पिकण्यास सुरुवात होते. पिकेपर्यंत हा आंबा तब्बल 16 वेळा रंग बदलतो. पूर्ण पिकल्यावर त्याचा रंग लाल होतो. एक किलो आंब्याचा दर तब्बल चार हजार रुपये आहे.