
सामना ऑनलाईन । कल्याण
बाप्पाच्या मंडपासाठी कल्याण-डोंबिवलीत व्यावसायिक कर आकारणी केली जाणार आहे. तसा फतवाच कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने काढला असून गणेश भक्तांना तीव्र संताप व्यक्त होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे या फतव्यामुळे भडकली असून या निर्णयाला ठाम विरोध करण्यात आला आहे. गणेशोत्सव म्हणजे धार्मिक परंपरा असून तो इव्हेंट नाही. त्यामुळे अवाजवी करआकारणी मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
2 सप्टेंबरला गणेशोत्सव सुरू होत असला तरी आतापासूनच सार्वजनिक मंडळांची लगबग सुरू झाली आहे. मात्र सार्वजनिक मंडळे मंडपांना आकारण्यात येणाऱया भरमसाट दरांमुळे आणि जाचक अटींमुळे नाराज आहेत. गेल्या वर्षी एक खिडकीद्वारे परवानगी झटपट मिळत होती. आता पोलीस, पालिका, अग्निशमन, महावितरण असे हेलपाटे मारावे लागणार आहेत. परवानगी शुल्काक्यतिरिक्त अग्निशमन विभागाला हजार रुपये जादाचे भरावे लागणार आहेत. शिवाय रस्त्यावर खड्डा खोदल्यास दहा हजारांचा दंड आकारला जाणार आहे. पालिका प्रशासन इक्हेंट या पद्धतीने सार्वजनिक गणेशोत्सवाकडे बघत असल्याने कल्याण-डोंबिवलीतील 550 मंडळांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
महासभेच्या ठरावाचा विसर
गणेशोत्सव मंडळांना 15 रुपये स्क्केअर फूट दर न आकारता नाममात्र भाडे आकारून मंडप उभारणीसाठी परवानगी द्यावी, असा ठराव दोन वर्षांपूर्वीच महासभेने केला आहे. तत्कालीन नगरसेवक रवी पाटील यांनी मांडलेल्या ठरावानुसार हा दर 5 रुपये करण्यात आला. या ठरावाकडे दुर्लक्ष करून 15 रुपयेप्रमाणे कर आकारणी केल्याने मंडळे संतप्त आहेत.
शिवसेना जाब विचारणार
गेल्या वर्षी पाच रुपये स्क्केअर फूट दर आकारला. मग याच वर्षी 15 रुपये दर करण्यामागे प्रशासनाचा हेतू काय? महासभेच्या ठरावाला बगल देऊन दर वाढवला आहे. शिवसेना मंडळांच्या पाठीशी ठाम आहे. दोन दिवसांत जर 15 रुपयांचा दर 5 रुपये केला नाही तर शिवसैनिक सोमवारी प्रशासनाला जाब विचारतील.


























































