अॅपवरून पैसे कापले जातात, पण तिकीटच मिळत नाही! यूटीएस ऍपच्या दर महिन्याला 1700 तक्रारी

40

सामना प्रतिनिधी, मुंबई

एकीकडे मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हीजनने एकाच दिवसांत 61,196 मोबाईल तिकीट विक्रीचा विक्रम केला असताना मोबाईल तिकीट विकत घेताना ट्रान्जेक्शन फेल झाल्याच्या तक्रारीही वाढत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या खात्यातून पैसे तर कट होत आहेत, परंतु तिकीट इश्यू होत नसल्याचे उघडकीस आले आहे. जानेवारी 2019 पर्यंत एकटय़ा मध्य रेल्वेवर दर महिन्याला पेमेंट संबंधित अशा सरासरी 1700 तक्रारी आल्या आहेत.

ऑनलाइन व्यवहारास चालना देण्यासाठी मुंबईत यूटीएस मोबाईल ऍपचे तत्कालीन रेल्वेमंत्री प्रभू यांच्या हस्ते 22 डिसेंबर 2014 रोजी उद्घाटन केले होते. मात्र, या ऍपमध्ये रेल्वे प्रशासनाची फसगत होऊ नये म्हणून मोबाईलवरून पेपरलेस तिकीट काढताना 2 कि.मी. ते 15 मीटर स्टेशन यायच्या आधी अंतर बंधनकारक करण्यात आले आहे. ऑनलाईन तिकीट काढताना पैसे बँकेतून कापले जातात. मात्र, बर्याचदा तिकीट इश्यू केले जात नसल्याचे उघडकीस येत आहे. ट्रान्जेक्शन फेल झाल्याने पुन्हा तिकीटांसाठी रांग लागावी लागत असल्याकडे प्रवासी वैतागले आहेत.

पेमेंटसंबंधित तक्रारीचा पाढा
जानेवारी -2719
फेब्रुवारी -1965
मार्च -3293
एप्रिल -2851
मे -2673
जून -3312

आपली प्रतिक्रिया द्या