
माहीम येथील एस.एल. रहेजा हॉस्पिटल, पहर्टिस असोसिएटने ओएनजीसी सीआयएसएफ कर्मचाऱ्यांसाठी बेसिक लाईफ सपोर्ट प्रशिक्षण आयोजित केले. सीनियर इन्स्पेक्टर अब्दुल रिझवान यांच्यासह 35हून अधिक सीआयएसएफ कर्मचाऱ्यांना डॉ. अमित नाबर, प्रमुख-इमर्जन्सी मेडिसीन आणि सर्जिकल आयसीयू यांनी प्रशिक्षण दिले. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सीआयएसएफ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आणि आपत्कालीन परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी कर्मचाऱ्यांना शिक्षित करणे हे या सत्राचे उद्दिष्ट होते.






























































