निवडणूका आल्या की भाजप सरकार सर्जिकल स्ट्राईक करते, काँग्रेसचा आरोप

1165

रविवारी हिंदुस्थानी लष्कराने पाकव्याप्त कश्मीरमध्ये कारवाई करत दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले आहेत. लष्कराच्या कारवाईमध्ये अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले असून पाच पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. तसेच अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला असण्याची दाट शक्यता आहे. हिंदुस्थानकडून केला गेलेला हा दुसरा सर्जिकल स्ट्राईक असल्याचेच बोलले जात आहे.

या सर्जिकल स्ट्राईकवरून काँग्रेसने पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘सर्जिकल स्ट्राईक हे नेहमी एखाद्या महत्त्वाच्या राज्यातील निवडणूकांच्या आधीच कसे होतात?, असा सवाल काँग्रेसकडून केला जात आहे. महाराष्ट्र व हरयाणामध्ये 21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. मतदानाच्या एक दिवस आधी हा स्ट्राईक करण्यात आल्याने काँग्रेसने भाजपला लक्ष्य केलं आहे.

हिंदुस्थानी लष्कराची पीओकेमध्ये दहशतवाद्यांच्या तळावर कारवाई, 5 पाकिस्तानी सैनिक ठार

‘मोदीजींच्या सरकाराच्या काळात जेव्हा केव्हा एखाद्या राज्यात निवडणूका असताता. सर्जिकल स्ट्राईक घडवला जातो. आता या निवडणूकीतील महत्त्वाच्या मुद्द्यावरून लोकांचे लक्ष हटविण्यासाठी सर्जिकल स्ट्राईकवरून राजकारण केले जाईल’, अशी टीका काँग्रेसचे नेते अखिलेश सिंग यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या