काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर जीवघेणा हल्ला, स्वत: ट्विट करून दिली माहिती

काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आणि आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. त्यांच्याच मतदारसंघातील कसबे दवंडा या गावात त्यांच्यावक अज्ञातांनी हा हल्ला केला असून त्यानी स्वत: ट्विट करून याची माहिती दिली आहे. या हल्ल्यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र यामुळे खळबळ उडाली आहे.

‘आज कळमनुरीतील (हिंगोली जिल्हा) कसबे दवंडा या गावामध्ये माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला. अज्ञात व्यक्तीने माझ्यावर मागून हल्ला केला. मला इजा करण्याचा हा प्रयत्न होता आणि माझ्या जीवाला धोका आहे. एका महिला आमदारावरील हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे. समोरून लढा, मागून भित्र्यासारखा हल्ला करु नका’, असे ट्विट आमदार प्रज्ञा सातव यांनी केले आहे.

दरम्यान, प्रज्ञा सातव या दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी असून त्या विधानपरिषदेवर आमदार आहेत. हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना कळमनुरी तालुक्यातील कसबे दौंड या गावामध्ये त्यांच्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे.