भाजप आयटीसेलविरोधात काँग्रेसचे सोशल मीडिया वॉरियर्स

congress-logo

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून सत्तेबाहेर असलेल्या भाजपकडून सातत्याने अपप्रचार सुरू आहे. सोशल मीडियाद्वारे खोटय़ा बातम्या पसरवून समाजात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करणाऱया भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने 428 सदस्यांची सोशल मीडिया वॉरियर्स टीम सज्ज केली आहे.

काँग्रेसच्या सोशल मडिया विभागाने 2019च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. तसेच लॉकडाऊनच्या काळात पक्षाची भूमिका जनतेतील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्याचे काम अतिशय प्रभावीपणे केले.

महाविकास आघाडी सरकार तसेच काँग्रेस विरोधात समाजमाध्यमांत सुरू असलेला अपप्रचार काँग्रेसचे ‘सोशल मीडिया वॉरियर्स हाणून पाडतील, असा विश्वास काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष अभिजीत सपकाळ यांनी व्यक्त केला.

काँग्रेसने 428 पदाधिकाऱयांचा समावेश असलेली सोशल मीडिया विभागाची मेगा कार्यकारिणी जाहीर केली. यात 48 जिल्हाध्यक्ष, 252 विधानसभा अध्यक्ष, 118 प्रदेश कार्यकारिणी सदस्य व 10 कोअर कमिटी सदस्यांचा समावेश आहे. आगामी काळात पक्षाची ध्येयधोरणे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ही कार्यकारिणी करणार असल्याचे सपकाळ यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या