
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यस्तरीय दोन दिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन खडकवासला येथे करण्यात आले आहे. हे शिबीर उद्यापासून (दि. 11) होणार असून, 12 ऑगस्टपर्यंत चालेल. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली हे शिबीर होणार आहे.
राज्यभरातील सुमारे 250 ते 300 काँग्रेस पदाधिकारी सहभागी होणार असून, पक्षाच्या सध्याच्या राजकीय स्थितीवर चिंतन व आढावा घेण्यात येणार आहे. या माध्यमातून पक्षाची ध्येयधोरणे, तत्त्वज्ञान आणि भविष्यातील दिशा ठरवण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा अपेक्षित आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण काँग्रेस विभागांना या शिबिराचे यजमानपद देण्यात आले आहे. शिबिरामध्ये विविध विषयांवर सत्रं आयोजित केली जाणार आहेत.