‘ती’ बुरखा घालून ‘मिस इंग्लंड’च्या फायनलमध्ये!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

एखाद्या सौंदर्य स्पर्धेत मुस्लिम युवतींनी बुरखा घालून रॅम्पवर उतरणे तसे नवीन नाही. पात्रता फेरीत काही मुस्लिम युवतींनी बुरखा वापरून कॅटवॉक केलेला आहे. मात्र एखाद्या सौंदर्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत बुरख्यासह रॅम्पवर मॉडेल कधी दिसली नाही.

यंदा ‘मिस इंग्लंड’ स्पर्धेच्या फायनलला वेगळे चित्र दिसणार आहे. सारा इफ्तेखार ही मुस्लिम मॉडेल हेडस्कार्फ घालूनच रॅम्पवर उतरेल. सारा ही कायद्याचा अभ्यास करीत आहे. तिने याआधी ‘मिस हडर्सफिल्ड’ आणि यॉर्कशायरचा ‘मिस पॉप्युलॅरिटी राऊंड’ जिंकलेला आहे. प्रत्येक व्यक्ती वजन, रंग, आकार, वंश यांच्या पलीकडे जाऊन सुंदर असते, असे मत सारा हिने व्यक्त केले आहे.

summary-contestant to wear burka at beauty contest