
कोशिश करनेवालों की हार नही होती, तेव्हा अपयशाने खचून जाऊ नका. जोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करीत रहा. हे प्रयत्नच आपणास यशापर्यंत घेऊन जातील हे लक्षात ठेवा, असा सल्ला पोलीस उपायुक्त रूपाली अंबुरे यांनी विद्यार्थ्यांना दिला. प्रबोधन कुर्ला शाळा आणि पल्लवी फाउंैडेशनने आयोजित केलेल्या धमाल एक्स्प्रेस ऑनलाइन उन्हाळी शिबिरात आठव्या दिवशी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. ‘वयात येताना’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.
रूपाली अंबुरे पुढे म्हणाल्या की, वयात येताना मुलींनी गुड टच, बॅड टच यातील फरक ओळखावा आणि याबाबत आपल्या आईला मैत्रिणीला आवर्जून सांगावे. नाहीतर काही विपरीत तुमच्याबाबतीत घडण्याची शक्यता आहे. आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे, कुठे जायचे आहे याबाबतचे ध्येय निश्चित करा आणि त्यानुसार मार्गक्रमण करा. ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न सतत सुरू ठेवा.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी वयात येणाऱया मुलींसाठी प्रबोधनपर अशा आठ पुस्तकांचा संच प्रबोधन कुर्ला शाळेला भेट दिला. यावेळी सूत्रसंचालन विद्या फलके व योगिता देशमुख यांनी केले. यावेळी संस्था अध्यक्ष भाऊ कोरगावकर, नगरसेविका सान्वी तांडेल उपस्थित होते.
पत्रकारितेत करिअर सुरू झाल्यानंतर अभ्यास सुरू होतो
पत्रकारिता हे चांगले क्षेत्र आहे. फक्त या क्षेत्रात आपले करिअर सुरू झाल्यानंतर याचा अभ्यास सुरू होतो. या क्षेत्रात हे उलटे आहे. फक्त या क्षेत्रातील ग्लॅमरकडे आकर्षित न होता काम करीत राहिले पाहिजे. अभ्यासपूर्ण पत्रकारिता केली पाहिजे, असा मौलिक सल्ला ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी दिला.
व्यावसायिक शिक्षण ही काळाची गरज आहे. हे शिक्षण देताना मुलांचा कल ओळखून त्याप्रमाणे त्यांना जर शिक्षण दिले गेले, त्यांचे छंद जोपासले गेले तर ही मुले स्पर्धेच्या युगात वाहवत न जाता ते आपले करिअर चांगल्याप्रकारे करू शकतील, असेही देशपांडे म्हणाले. ‘पत्रकारिता’ या विषयावर त्यांनी संवाद साधला. नयना परदेशी आणि विशाखा परब यांनी त्यांची मुलाखत घेतली. प्रा. नितीन बानगुडे यांनीही यावेळी शुभेच्छापर मार्गदर्शन केले.


























































