
सेफ जिंदगी डॉट इनद्वारे मित्र क्लिनिक सुरु केले आहे. हे देशातील पहिले सर्वसमावेशक ट्रान्सजेंडर क्लिनिक आहे जे ट्रान्सजेंडर समुदायाच्या सदस्याद्वारे ट्रान्सजेंडर लोकांसाठी चालवले जात आहे. क्लिनिकमध्ये ट्रान्सजेंडर लोकांना इन-क्लिनिक सेवा जसे की एचआयक्ही/ एसटीआय समुपदेशन आणि स्क्रिनिंग, मनोसामाजिक समर्थन, लिंग पुष्टीकरण आणि कायदेशीर/सामाजिक संरक्षण समर्थन दिले जातात. सध्या, मित्र क्लिनिक कल्याण, पुणे आणि हैदराबाद शहरात कार्यरत आहेत.




























































