पुरुषांच्या सेक्स हार्मोन्सवर कोरोनाचा हल्ला, म्हणून मृत्यूदर अधिक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगात आतापर्यंत 3 कोटीहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 10 लाखहून अधिक रुग्णंचा मृत्यू झाला आहे. हिंदुस्थानातही आतापर्यंत 97 हजारहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पुरुष रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. कोरोना पुरुषांच्या सेक्स हार्मोनवर हल्ला कतो. त्यामुळे पुरुषांच्या मृत्यूंचे प्रमाण अधिक असल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे.

पुरुषांमध्ये टेस्टोस्टरॉन नावाचा हार्मोन असतो. कोरोना विषाणू या हार्मोन्सवर हल्ला करतो. परिणामी रुग्णाची तब्येत खालावते आणि त्याचा मृत्यू ओढवतो. तुर्कीच्या मेर्सिन विद्यापीठाने एक अभ्यास केला आहे. त्यांनी द एजिंग या पुरुषांसाठीच्या मासिकात लेखही छापला आहे. त्यात दिलेल्या माहितीनुसार कोरोना विषाणू रुग्णाच्या सीर टेस्टोस्टेरोनचे गणित बिघडवतो. टेस्टोस्टेरोनचे प्रमाण इतके कमी होते होते की रुग्णाचे शरीर विषाणूशी लढूच शकत नाही. तेव्हा रुग्णाला आयसीयुत भरती केले जाते. तर काही रुग्णांचा यात मृत्यूही होतो.

टेस्टोस्टेरोन नावाचे हार्मोन पुरुषांच्या सेक्स हार्मोनपैकी एक आहे. पुरुषाच्या वृषणमध्ये या हार्मोन्सची निर्मिती होती. या हार्मोनमुळेच पुरुषांमध्ये काम इच्छा वाढते. जर पुरुषामध्ये टेस्टोस्टेरोनचे प्रमाण कमी झाले तर त्याल थकवा येतो, अशक्तपणा येतो, केस गळतात, वजन कमी होते. हा हार्मोन पुरुषाच्या लैंगिक विकासाशी थेट संबंधित आहे.

पुरुषाच्या वयाच्या चाळीशीनंतर टेस्टोस्टेरोन 0.8 ते 2 टक्क्यापर्यंत घसरत जातो त्यामुळे वयस्कर पुरुषाला कोरोनाची लागण झाल्यावर त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो असेही अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.