
देश कोरोनाच्या महामारीशी सामना करत असताना लोकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने आज ट्विटर सेवा सुरू केली.
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी @CovidIndiaSevaची घोषणा आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन केली. या अकाऊंटवर ट्विट करुन प्रश्न विचारल्यास नेटकऱ्यांना त्याची त्वरीत उत्तर देण्यात येतील. या उपक्रमामुळे सद्यस्थितीमध्ये मंत्रालयाला लोकांसोबत प्रभावीपणे संवाद साधता येईल. तसेच देशवासीयांचे त्यांच्या आरोग्यविषयक चौकशीचे जलदपणे समाधान करण्यात येणार आहे.





























































