Corona management – दादरमध्ये भाजी मार्केटसाठी 200 पीचेस, गर्दी कमी करण्यासाठी निर्णय

896

दादरमध्ये भाजी खरेदीसाठी होणारी गर्दी कमी करण्यासाठी सेनापती बापट मार्गावर दोन मीटरचे अंतर ठेवून 200 पीचेसची आखणी करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहक आणि व्यापारी यांनी गर्दी न करता पीचेसच्या आखणीनुसार काम करावे असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

देशात लॉकडाऊन असताना दादरसह मुंबईच्या अनेक भागात जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नाहक गर्दी करीत असल्याचे समोर येत आहे. यामध्ये दररोज सुमारे 200 घाऊक व्यापारी दादर रटेशनला येतात व मुंबईतील हजारो स्थानिक घाऊक व्यापारी त्यांच्याकडून खरेदी करतात. ही गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने सेनापती बापट मार्गावर सुमारे 200 पिचेसची आखणी करण्यात आली असून याबाबत सर्वांना नियम पाळण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. पीचेसच्या आखणीनुसार व्यापारी आणि ग्राहक वागत आहेत की नाही यावर स्थानिक पोलीस ठाणे व महानगरपालिका प्रशासनाकडून देखरेख ठेवण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या