
कोरोना बाहेरच्या संदर्भात आज सात जणांपैकी पाच जणांचे रक्ताचे नमुने हे पुणे येथे पाठवण्यात आले आहेत. तर पंधरा जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आत्तापर्यंत 36 पैकी पस्तीस जणांची तपासणी करण्यात आली असून एकूण 21 जण सध्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहिती आज प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
कोरोना संदर्भामध्ये तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने नगरमध्ये बैठकांचे सत्र घेऊन विविध प्रकारचे आवाहन केले होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रवीण मुरंबीकर, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे, यांच्यासह महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी विशेष खबरदारी म्हणून स्थानिक पातळीवर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते.
नगर जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 36 जणांची तपासणी करण्यात आलेले आहे. यातील एक रुग्ण हा पॉझिटिव सापडलेला आहे. दोन दिवसापूर्वी आठ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. त्यापैकी एकाला फक्त स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.
आज सात जणांची तपासणी करण्यात आलेली आहे. हेच सात जण प्रवासातून म्हणजेच बाहेर देशातून आल्याचे निष्पन्न झाले होते. म्हणून त्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील पाच जणांचे रक्ताचे नमुने हे तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आलेले आहेत. तर , दोघांना घरी निरीक्षणासाठी ठेवण्यात आलेले आहेत.
राज्य सरकारने जनजागृती करण्यासाठी होर्डिंग, बॅनर लावावे , अशा सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज येथे प्रशासनाला त्या प्रकारच्या सूचना दिल्या असून त्याची अंमलबजावणी तात्काळ करा असे निर्देश दिले.
कोरोना पार्श्वभूमीवर आत्तापर्यंत जिल्हा प्रशासनाकडून 36 जणांचे नमुने पाठवण्यात आले होते. त्यापैकी 13 जणांचे सॅम्पल टेस्ट रिपोर्ट आत्तापर्यंत प्रशासनाला मिळाले आहेत. त्यामध्ये एका जणाला कोरोना ची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर, एका जणाला स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे समोर आले आहे. आत्तापर्यंत जिल्हा रुग्णालयात 18 एका खासगी हॉस्पिटलमध्ये दोन व बूथ हॉस्पिटलमध्ये एक असे एकूण 21 जण जिल्हा प्रशासनाच्या निरीक्षणाखाली आहेत. तर पंधरा जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.





























































