Breaking – ‘कोविशिल्ड’ला आपत्कालीन वापरासाठी परवानगी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याबाबत राजधानी नवी दिल्लीत तज्ज्ञांच्या समितीची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत ऑक्सफर्ड एस्ट्राझेनेकाच्या ‘कोविशिल्ड’ या कोरोनावरील लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिले आहे.

या लसीला मान्यता देण्यात आल्याने लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 30 कोटी लोकांना लस देण्यात येण्याची शक्यता आहे.

कोविशिल्डला आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्याबाबत समितीच्या याआधीही दोन बैठका झाल्या आहेत.  त्या बैठकांमध्ये लस उत्पादक कंपन्याकडून काही माहिती मागवण्यात आली होती.

या बैठकीत लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी मिळाल्यानंतर लस देण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. कोरोना लसीच्या वितरणाबाबत आणि लस देण्याबाबत सरकारने योजना आखली आहे.

देशभरात 2 जानेवारीपासून लस देण्याची रंगीत तालीम सुरू होणार आहे. त्याच्या तयारीबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येत आहे.

याआधी पंजाब, आसाम, गुजरात आणि आंध्र प्रदेशमध्ये लसीची रंगीत तालीम घेण्यात आली आहे. त्या सकारात्मक ठरल्या आहेत. तसेच या लसीचे पाच कोटी डोस तयार आहेत.