कोरोनामुळे नाट्यव्यवसायावर संकट, प्रशांत दामलेंची कामगारांना 10 हजारांची मदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूने महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 40 पार गेली असून मुंबईत एकाच मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे शाळा, कॉलेजला सरकारने सुट्टी जाहीर केली आहे. तसेच याचा प्रभाव बॉलिवूड, मराठी आणि नाट्यसृष्टीवरही पडत आहे. अनेक चित्रपटांचे शूटिंग, प्रदर्शन रेंगाळले आहे. नाट्यव्यवसायही यामुळे संकटात सापडला आहे. मुंबई, पुण्यातील नाटकांचे शो रद्द झाल्याने कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. अशा वेळी सामाजिक भान राखत प्रसिद्ध मराठी अभिनेते, निर्माते प्रशांत दामले यांनी कामगारांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

प्रशांत दामले यांनी कोरोनामुळे नाट्यव्यवसायावर आलेले सावट पाहता आपल्या पडद्यामागील कलावंतांना मदतीचा हात दिला आहे. दामले यांनी एकूण 23 जणांना प्रत्येकी 10 हजार रुपयांची मदत दिली आहे. कोरोनामुळे संकटात सापडलेला हा व्यवसाय कधी सुरळीत सुरू होईल याची शाश्वती नाही. अशात आपल्यासाठी पडद्यामागे राबणाऱ्या हातांना सामाजिक जबाबदारी दाखवत मदत करणाऱ्या प्रशांत दामले यांचे कौतुक होत आहे. अभिनेता, निर्माता पुष्कर क्षोत्री आणि राजेश देशपांडे यांनी याबाबत पोस्ट शेअर केली आहे.

screenshot_2020-03-17-13-01-06-499_com-saamana-app_copy_700x450

दरम्यान, पुष्कर क्षोत्री यांनी शेअर केलेल्या पोस्टवर प्रशांत दामले यांनी उत्तर दिले आहे. हे माझे कर्तव्य आहे, असे प्रशांत दामले यांनी म्हटले आहे.

screenshot_2020-03-17-12-35-58-653_com-facebook-katana_copy_700x450