कोरोनाने संक्रमित झालेल्या तरुणाची दिल्लीतील रुग्णालयात आत्महत्या

882

जगभरासह हिंदुस्थानातही आता कोरोना व्हायरसची व्याप्ती वाढत आहे. तसेच जनतेत कोरोनाबाबतची भीतीही दिसत आहे. नवी दिल्लीत सफदरजंग रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आलेल्या कोरोना संक्रमित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी संध्याकाळी घडली आहे. हा तरुण वर्षभर सिडनीमध्ये होता. त्याला डोकेदुखीचा त्रास होत असल्याने विमातळाहून त्याला थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

या तरुणाची तपासणी केल्यानंतर त्यात कोरोनाची लक्षणे आढळली होती. त्याच्या लाळेच्या नमुन्यांच्या परीक्षणानंतर तो कोरोना संक्रमित असल्याने निष्पन्न झाल्याने त्याला विलगीकरण कक्षात देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. या तरुणाने बुधवारी संध्याकाळी रुग्णालयाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. कोरोनाबाबत पुरेशी जनजागृती नसल्याने अशा घटना घडत असल्याचे सांगण्यात आले.तसेच जगभरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने याबाबत दहशतही निर्माण झाली आहे. नवी दिल्लीत कोरोनाचे आणखी दोन रुग्ण आढळल्याने दिल्लीतील रुग्णांची संख्या आता 19 वर गेली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या