पोलीस खात्याला दिले 725 कापडी मास्क; पद्मशाली युवा शक्तीचा सामाजिक उपक्रम

298

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. प्रशासनाला अहोरात्र योगदान देणाऱ्या पोलिसांचा कोरोनापासून बचाव व्हावा, यासाठी नगरच्या पद्मशाली युवा शक्ती या संस्थेच्या वतीने संस्थेच्या सभासदांनी घरीच शिवलेले 725 दर्जेदार कापडी मास्क पोलीस अधिक्षक अखिलेश सिंह यांच्याकडे पद्मशाली युवा शक्तीचे योगेश म्याकल, सुमित इप्पलपेल्ली, सागर बोगा व दिपक गुंडू यांनी सुपूर्द केले आहेत. यावेळी पोलीस अधिकारी राहुल गुंडू व अभिजित अरकल उपस्थित होते.

कोरोना व्हायरसचे संकट दूर करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करून प्रशासनाला मदत करण्याची गरज आहे. पोलीस दिवसरात्र एक करत सेवा बजावत आहेत. कोरोनापासून पोलिसांचे संरक्षण व्हावे या उद्देशाने त्यांना कापडी मास्क देऊन पद्मशाली युवा शक्तीच्या वतीने हा सामाजिक उपक्रम राबवला आहे. यासाठी ज्ञानेश्वर सब्बन, कोमल मच्चा, सुनंदा इप्पलपेल्ली, वैशाली आडेप, नितीन रायपेल्ली, भुमेश इप्पलपेल्ली, ज्योती उन्हाळे, आनंद गुंटुक आदींनी घरी कापडी मास्क शिवून सहकार्य केले, अशी माहिती योगेश म्यकाल यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या