कोरोनामुक्त झालेला व्यक्तीही इतरांना संक्रमित करू शकतो, शास्त्रज्ञांच्या दाव्याने खळबळ

प्रातिनिधिक फोटो

कोरोनामुक्त झालेला रुग्ण इतरांना संक्रमित करू शकत नाही असा आजपर्यंत आपला समज होता. मात्र आता कोरोनामुक्त झालेला रुग्ण देखील इतरांना संक्रमित करू शकतो असा दावा ब्रिटिश शास्त्रज्ञांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

ब्रिटिश शास्त्रज्ञांनी गुरुवारी एक अहवाल प्रसिद्ध केला. एखाद्या रुग्णाला कोरोना झाला आणि योग्य उपचारानंतर तो कोरोनामुक्त झाल्यास त्याच्या शरिरात जवळपास 5 महिन्यांसाठी कोरोनाविरुद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती निर्माण होते. तो व्यक्ती पुन्हा कोरोना संक्रमित होणार नाही, मात्र त्याच्या संपर्कात आलेल्या दुसऱ्या लोकांना त्याच्यामुळे कोरोनाचे संक्रमण होऊ शकते, असा अहवाल शास्त्रज्ञांनी दिला आहे.

नवभारत टाइम्स‘ने दिलेल्या वृत्तानुसार, पब्लिक हेल्थ इंग्लंडने (पीएचआय) याबाबत संशोधन केले आहे. यात असे आढळून आले की कोरनामुक्त झालेल्या व्यक्तीच्या शरिरात प्रतिकारशक्ती वाढते. नव्याने संक्रमित होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्या लोकांना पुन्हा संक्रमित होण्याचा धोका नगण्य असतो. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या शरिरात जवळपास 5 महिने प्रतिकारशक्ती राहते. अशा व्यक्तीला पुन्हा कोरोना होण्याचा धोका कमी असला तरी तो व्यक्ती नाक आणि घशातील विषाणूचा वाहक असू शकतो. यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना होण्याचा धोका असतो.

याबाबत पीएचआयचे वरिष्ठ अभ्यासक प्रोफेसर सुसैन हॉपकिन्स यांनी म्हटले की, हे सुरुवातीचे निष्कर्श आहेत. कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये प्रतिकारशक्ती वाढल्याचे दिसले, मात्र तो व्यक्ती कोरोनाचा वाहक असू शकतो आणि त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्यांना तो संक्रमित करू शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या