
लसीकरण आणि वाढत्या चाचण्यांमुळे धारावीत गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात कमी होत असून धारावीत गुरुवारी दिवसभरात 9 कोरोना रुग्ण सापडले असून सक्रिय रुग्णांची संख्या एक हजारवरून 616 वर आली आहे. दुसऱ्या लाटेत दुसऱ्यांदा आलेली ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने धारावीत सुरुवातीपासून विविध प्रतिबंधात्मक तसेच जनजागृती मोहिमांवर भर दिला. पहिल्या लाटेचा यशस्वी मुकाबला करून कोरोनाला नियंत्रणात आणल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय, जनजागृती यासह महापालिका दुसऱ्या लाटेत लसीकरण आणि कोरोना चाचण्या वाढवण्यावर भर देत आहे. दरम्यान, दादरमध्ये गुरुवारी 17 तर माहीममध्ये 32 रुग्ण आढळले.

























































