काळजी नको, काळजी घ्या! मुख्यमंत्र्यांचे आवाहन

299

महाराष्ट्रात आढळून आलेल्या कोरोनाच्या सर्व रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे नाहीत. त्यामुळे काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे महत्त्वाचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केले.

कोरोनाबाबतचा राज्यव्यापी आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातून सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, मुख्य सचिव अजोय मेहता आदी उपस्थित होते.

विलगीकरण कक्षाची सुविधा

यात्रा, शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द करावेत. जे परदेशातून प्रवास करून आले आहेत त्यांनी 14 दिवसांपर्यंत घरीच थांबावे. आंतरराष्ट्रीय विमानतळे असलेल्या शहरांमध्ये विलगीकरण सुविधा तातडीने निर्माण करावी. जिल्हाधिकाऱयांनी आरोग्य सेवा देणाऱया कर्मचाऱयांसाठी पुरेशा प्रमाणात मास्क उपलब्ध व्हावेत याचा आढावा घ्यावा. प्रत्येक शहरातील टुर ऑपरेटर्सनी परदेश प्रवास केलेल्या आणि सध्या परदेशात असलेल्या प्रवाशांची यादी प्रशासनाला द्यावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

यात्रा-धार्मिक कार्यक्रम रद्द

पुढील किमान 15 ते 20 दिवस शहरांमधील धार्मिक कार्यक्रम, यात्रा रद्द करण्याबाबत विविध संस्थांना विनंती करा, लोकांना प्रशिक्षित करा. कोरोनाच्या संशयित रुग्णांची ओळख, त्यांचे विलगीकरण या बाबींवर भर द्या, अशा सूचना मुख्य सचिवांनी यावेळी केल्या.

आपली प्रतिक्रिया द्या