आता हेच पाहायचं बाकी होतं, नवरदेवाला पेंट रोलरने लावली हळद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे लग्नसमारंभांवर अनेक बंधने आली आहेत. मोजकेच पाहुणे, वेळेची मर्यादा  अशा नव्या नियमांचे पालन करून लग्न लावली जात आहेत. नियमांचे पालन करण्यासाठी केवळ हॉलवरच नाही तर लग्नघरीदेखील भन्नाट जुगाड केले जातायत. अशाच एका सोशल डिस्टन्सिंग हळदी समारंभाची सोशल मीडियावर चर्चा आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत एका नवऱया मुलाला हळद लावली जातेय. मात्र कोरोनामुळे नवऱया मुलाला थेट हातांऐवजी चक्क रंगकामासाठी वापरल्या जाणाऱया स्पंज रोलरने हळद लावली जातेय. या व्हिडिओवर अनेकांच्या मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी याला ‘सोशल डिस्टन्सिंग हळद’ असे म्हटलेय, तर काहींनी ‘हळद लावताय की एशियन पेंट’ अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.