आता नगरसेवकांना आपल्या विकासकामांचे श्रेय घेता येणार

507
bmc

 

मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांना आता फलक लावून आपण केलेल्या विकासकामांचे श्रेय घेता येणार आहे. यासाठी नव्या जाहिरात धोरणात मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आवश्यक बदल करण्यात येणार आहेत.

पालिका कार्यक्षेत्रातील 24 वॉर्डांमधून निवडून आलेले नगरसेवक आपल्या नगरसेवक निधीतून अनेक नागरी, विकासकामे करीत असतात. शिवाय नगरसेवकांच्या पाठपुराव्यातून अनेक मोठे प्रकल्पही राबवण्यात येतात. मात्र नगरसेवक निधीतून केलेल्या कामांची माहिती जाहिरात फलकावर प्रदर्शित करण्यासाठी नगरसेककांना अनेक जाचक अटींना सामोरे जाके लागते. शिवाय अनधिकृतरीत्या फलक लावल्यास पालिकेकडून कारवाई करण्यात येते. म्हणून नगरसेवकांना केलेल्या नागरी कामांची माहिती दर्शवणारे फलक लावण्याची परवानगी द्यावी अशी मागणी नगरसेविका प्रमिला शिंदे यांनी पालिका महासभेत ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या